
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील खडकी फाट्यानजीक भरधाव दुचाकी रोडवरुन घसरुन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ता.३० मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान घडली.
सुरेश टेकाम (२७) रा.वाई वागदरा असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान ३० मे रोजी सुरेश हे आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.२९ बी.एन.२०९८) काही कामानिमित्त मारेगाव येथे आले असता सायंकाळी सात वाजेदरम्यान स्वगृही परतीच्या प्रवासात असताना वणी- यवतमाळ राज्य महामार्गावरील खडकी फाट्यानजीक भरधाव दुचाकी रोडवरुन घसरली.यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागून ते गंभीर जखमी झाले.
रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना प्राथमिक उपचाराकरिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून वृत्त लिहीपर्यंत त्यांचेवर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.