
– देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा व वणीतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेल्यांचा सन्मान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, ६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ.शेख व बोबडे यांचा सन्मान करण्यात आला.तसेच आपल्या देशाला ज्यांनी सेवा दिली असे माजी सैनिक संतोष पुंड व गजाननजी भटगरे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर , मुख्य व्यवस्थापक दवे, तसेच वरिष्ठ व्यवस्थापक रवि इंगळे यांचे मार्गदर्शनात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, ६ वा वर्धापनदिन वणी शाखेत दिनांक २७ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
रोपटं लावणं अगदी सोपं असतं,मात्र त्याची जोपासना करणं तितकंच कठीण…..आणि जोपासना जर योग्य पद्धतीने झाली तर…त्या रोपट्याचे रूपांतर एक मोठ्या वटवृक्षात पहावयास मिळते ….त्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे आज आपल्यासमोर उभी असलेली गोदावरी अर्बनची वणी शाखा.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा, प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे व सेवानिवृत्त शिक्षक बाकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन राजु गव्हाणे, प्रास्ताविक वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार मारोती मोडक, यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, भद्रावती शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, मुकुटंबन शाखा अधिकारी धम्मपाल निमसटकर, ऑफिसर अपर्णा केदार, विद्या निंबाळकर मॅडम, कनिष्ठ अधिकारी सौ. प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे, अमोल देऊळकर, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार यांनी प्रयत्न केले तर यावेळी समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता, ठेवीदार उपस्थित होते.