
– ग्रा.प.सदस्य सोमेश्वर गेढेकार यांची ‘आमरण उपोषणातून’ प्रशासनास आर्त हाक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
तालुक्यातील गौराळा येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने ही बाब कायम दुर्लक्षित केल्याने अखेर येथील ग्रा.प.सदस्य सोमेश्वर गेढेकार यांनी २५ एप्रिल रोजी मारेगाव पंचायत समिती समोर ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसत ‘रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करून देण्यात यावे’ अशी आर्त हाक प्रशासनास दिली.
स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्गती झाल्याने तालुक्यातील गौराळा येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनास निवेदन देत सदर बाब लक्षात आणून दिली.
परंतु प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने अखेर येथील ग्रा.प.सदस्य सोमेश्वर बंडु गेढेकार यांनी २५ एप्रिल रोजी पंचायत समिती समोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसत प्रशासनाचे लक्ष वेधले.
जोपर्यंत स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करून देण्यात येत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे सोमेश्वर गेढेकार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गौराळा येथील सरपंच मयुरी धोबे, उपसरपंच अतुल गानफाडे, सदस्य अनिता कोयचाटे , सुरेखा कोरनाके यांचेसह गौराळा येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.