
– ग्रामस्थांची यवतमाळ येथे धडक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचे वारे अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील सिंदी येथील ग्रामस्थ येथील शिक्षकांच्या बदली विरोधात चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी ,यवतमाळ यांचे कार्यालयावर धडक देत येथील शिक्षकांची बदली थांबविण्यात यावी अशी मागणी केली.
शिक्षकांअभावी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत बिकट असताना सिंदी येथील शाळा सुद्धा याला अपवाद नाही. येथील जि.प.शाळेत १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असुन चालु शैक्षणिक सत्रांत ५५ विद्यार्थी सदर शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत आहे.
येथील मुख्याध्यापिका सौ.काकडे व सहाय्यक शिक्षक गौरव चिकाटे यांची ऑनलाईन बदली झाली.आधीच शाळेत तीन शिक्षक त्यात दोन बदली होऊन जाणार हे म्हणजे ‘नुपरीत तेराव्या महिन्यासारखे’ असून येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या आमच्या पाल्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार करिता येथील शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात अशा आशयाचे निवेदन १९ मे रोजी सिंदी येथील शेकडो ग्रामस्थांनी जि. प. मुख्याधिकारी यवतमाळ यांना दिले.
यावेळी नीलिमा थेरे, बंडू राऊत,सविता गुंजेकर, अश्विनी राऊत, बेबी ठाकरे, उज्वला कोसरे, कविता नरांजे, शुभांगी रामपुरे, उषा टेकाम, प्रियंका देवाळकर, वनिता साहिर यांचेसह सिंदी येथील शेकडो पालक उपस्थित होते.