
– ह.भ.प.श्रीकृष्ण पांडे महाराजांच्या मधुर वाणीने उपस्थित मंत्रमुग्ध
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नरसाळा येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री. हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत नरसाळा येथील उपसरपंच यादवराव पांडे यांच्या मार्गदर्शनातून श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले गेले असुन श्रीमद भागवत कथेचे पारायण ह.भ.प. श्रीकृष्ण पांडे महाराज (बनारस काशी ) यांच्या मधुर वाणीतून ते उपस्थिताना मंत्रमुग्ध करीत आहेत.
सदर भागवत गीतेचा सप्ताह भक्तिमय वातावरणात सात दिवस चालणार असून गावात आनंदाला उधाण आल्याचे दिसून येत आहे.सायंकाळी ७ वाजता ‘हरिपाठात’ गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सगळे भाग घेवून हरिपाठाचा आनंद घेतात.त्या नंतर भारूड हा कार्यक्रम होतो. त्यात जनजागृती चे विषय घेवून उपस्थितांचे मनोरंजन करून जनजागृती केली जाते.
कार्यक्रमाचे आयोजन नरसाळा येथील श्री. हनुमान देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ, गुरुदेव भजन मंडळ यांचे योगदानातुन करण्यात आले आहे.