
– नगर पंचायत प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने डासांच्या वाढीस योग्य हवामान उपलब्ध होत आहे. शहरात डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे.परिणामी नगरपंचायत प्रशासनही ‘ॲक्शन मोडवर’ आले असून शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणीचा ‘श्री गणेशा’ झाला आहे.
पावसाळ्याच्या दिवसात विविध विषाणूंच्या वाढीसाठी योग्य हवामान उपलब्ध होत असते. त्यांची वेळीच विल्हेवाट न लावल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. पावसाळ्यात डासांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याने त्यांचेवर वेळीच नियंत्रण मिळवण्याची गरज असते.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने शहरातील १७ ही वार्डात डास नियंत्रण औषध फवारणीचा ‘श्री गणेशा’ केला आहे.परिणामी नागरिकांतून नगरपंचायतच्या या स्तुत्य कार्याचे कौतुक होत आहे.