
— ग्रामस्थांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
भालेवाडी येथे ग्रामस्थांच्या पुढाकारातून समस्त ग्रामवासियांनी एकत्र येत श्रमदानातून व लोकवर्गणीतून हनुमान मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे.
तालुक्यातील भालेवाडी हे गाव आदिवासीबहुल असुन, मदनापुर व धामणी हे तीनही गाव मिळुन ग्रामपंचायत आहे. भालेवाडी हे गाव गट ग्रामपंचायत मध्ये असुन गावची लोकसंख्या ५९९आहे. आज प्रत्येक गावात एखादे मंदीर असावे ही त्या त्या गावातील नागरीकांची प्रामाणिक इच्छा असते. खेड्यात वास्तव्यास असतांना दिवसभर शेतीवाडीचे काम करुन आल्यानंतर आरामात चार लोकात एकत्र बसुन चर्चा करता यावी, यासाठी मंदिर, मंदिराचा ओटा त्यावर छान छत असाव म्हणून भालेवाडी येथील नागरीकांनी एकत्र येत बजरंगबली चे मंदिर बांधण्याचा ध्यास घेतला. यासाठी रक्कम सुध्दा लागेल म्हणून येथील नागरिकांनी लोकवर्गणी जमा केली.
लोकवर्गणीतून मजुरांना मजुरी देणे शक्य होणार नाही म्हणून भालेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान करण्याचे निश्चित केले. व आज येथील नागरीकांच्या श्रमदानातून बजरंगबली चे मंदिर पुर्णत्वास येत आहे.