
– मारेगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
– मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी चक्काजामचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकरी हिताच्या विविध मागण्यांकरिता ता.३ नोव्हेंबर रोजी शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाध्यक्ष संजय आवारी यांचे नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी मारेगाव तहसील कार्यालयावर धडक दिली.यावेळी विविध मागण्या असणारे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी मारेगावात चक्काजाम करू असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
मारेगाव तालुक्यात गत काही वर्षापासून शेतकरी आत्महत्येत कमालीची वाढ झाली आहे.अस्मानी व सुल्तानी संकटाचा कायम बळी पडत असलेल्या बळीराजास सर्व स्तरावरून मदतीचा हात देण्याची नितांत गरज आज तालुक्यात निर्माण झाली आहे.
दरम्यान ता.३ नोव्हेंबर रोजी शेतकरी हिताच्या विविध मागण्या संबंधीचे निवेदन शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.
सदर निवेदनात मुख्यत्वे कापसाला १० हजार रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला प्रति क्विंटल ७ हजार रुपये हमीभाव जाहीर करा, नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करा अथवा नवीन लावा, शेती पंपांना दिवसा ८ तास वीजपुरवठा करा,अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ अदा करा,निराधारांना तात्काळ मानधन द्या, पिक विम्याची अग्रीम रक्कम २५ टक्के दिवाळीपूर्वी द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनाची दखल न घेतली गेल्यास ६ नोव्हेंबर रोजी मारेगावात चक्काजाम करू व त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचेसह नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे,युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, सुनील गेडाम,गुरुदेव घोटेकर,चंद्रशेखर थेरे, मनोज वादाफळे, विजय अवताडे,दिगांबर नावडे,टुमदेव बेलेकर,सुरेश पारखी,राजु मोरे, मुकुंदा निवल,शुभम लालसरे,गजानन ठाकरे, अभय चौधरी,गणेश आसुटकर यांचेसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.