
– निवेदनातून प्रशासनास साकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतकरी हितासंबंधीच्या विविध मागण्या असणारे निवेदन घेऊन शेकडो शिवसैनिक शिवसेना तालुकाप्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचे नेतृत्वात ता.२५ जुलै रोजी येथील तहसील कार्यालयावर धडकले.यावेळी विविध मागण्या संबंधीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
ता.२५ जुलै रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात मुख्यत्वे पुढील मागण्या करण्यात आल्या आहे.
यात किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ क्लिपची चौकशी करून पिडीतांना योग्य न्याय द्यावा, जंगली जनावरांपासून पिकांचे होणारे नुकसान थांबवून नुकसान धारकांना योग्य तो मोबदला द्यावा, मारेगाव तालुका अतिवृष्टी ग्रस्त जाहीर करण्यात यावा, नियमित कर्जदारांना सानुग्रह अनुदान (५० हजार रुपये) त्वरित द्यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचेसह नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे, नगरसेवक जितेंद्र नगराळे, नगरसेविका वर्षा कींगरे, नगरसेविका माला बदकी, सुनील गेडाम,युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे,कृ.उ.बा.स.संचालक ब्रह्मदेव जुनगरी, मनोज वादाफळे, विजय अवताडे,टुमदेव बेलेकर,सुरेश पारखी,राजु मोरे, संजय जिवने आदी उपस्थित होते.