
– विविध चर्चांना उधाण
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील कुंभा परिसरातील मांगली गावाच्या रस्त्यालगत असलेल्या शेतात ता.११ सप्टेंबर रोजी दुपारी शेतमजुराचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली असून नानाविध चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यातील कुंभा येथील बाळू पांढरे यांचे शेत मांगली रस्त्यालगत आहे.त्यांच्या शेतात रोजंदारीने काम करण्याकरिता मारोती शेंद्रे (६५) रा. कुंभा हे गेले होते.परंतु काही वेळाने रस्त्यालगत असलेल्या शेतातील बांधावर त्यांचा मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मृत मारोती यांचेवर वन्य प्राण्यांनी हल्ला केला की आणखी काही ही बाब तुर्तास अंधारात असून शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.
तुर्तास पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.