
– तीन तासांत संशयित ताब्यात
– मारेगाव पोलीस पथकाने केली मोहीम फत्ते
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील एका सतरा वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना १३ मे रोजी घडली.सदर घटनेची तक्रार युवतीच्या वडीलांनी मारेगाव पो.स्टे.ला दाखल केली असता मारेगाव पोलीस पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे अवघ्या तीन तासांत अपर्हत्य युवतीचा शोध घेत एका संशयितास ताब्यात घेतले.
युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार १३ मे रोजीचे मध्यरात्री युवती घरी निदर्शनास आली नसल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईकांकडे विचारपूस केली असता युवतीचा थांगपत्ता लागला नाही.अखेर पीडितेच्या वडिलांनी १३ मे रोजी सकाळी युवतीच्या अपहरणाची रितसर तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली.
मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.परंतु युवतीचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता. अखेर मारेगाव पोलिसांनी ‘मोबाईल लोकेशनचा’ आधार घेत सदर युवतीच्या मोबाईलचे लोकेशन शोधून काढले.ते लोकेशन भद्रावती येथे असल्याचे कळताच पोलीस भद्रावती येथे रवाना झाले.
भद्रावती येथून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पीरली येथे अपह्रत्य युवतीचा ठावठिकाणा लागला.संजय गजानन देठे (२१) रा.सोनेगाव या संशयीतास मारेगाव पोलीस पथकाने ताब्यात घेत भादवी ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
ही कारवाई ना.पो.का.अजय वाभीटकर, रजनीकांत पाटील, अतुल सरोदे यांनी यशस्वीरित्या फत्ते केली.