
– मारेगाव शहरातील घटना
– युवक अर्जुनी येथील असल्याचा कयास
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील शहरातील नवनिर्मितीत असलेल्या लोढा हॉस्पिटल शेजारील झुडपात ता.२२ जुन रोजी दुपारी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात पुरती खळबळ उडाली आहे.
शहरातील वणी-यवतमाळ राज्यमार्गा लगतच लोढा हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. हॉस्पिटलचे उजव्या बाजूला प्रचंड झुडपांचे साम्राज्य पसरले आहे.या झुडपात गुरुवारी दुपारी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर युवकाचे नाव पंजाब अजाब आत्राम असुन तो मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील असल्याचा कयास आहे.
काल दुपारी सदर युवक हा मद्यप्राशन करून रस्त्याच्या कडेला पडुन होता असे अनेक प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे.अतिमद्य प्राशनाने युवकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून वृत्त लिहिते पर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.