
– डॉ.सपना केलोडे यांचा विद्यार्थिनींशी संवाद
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल येथे शालेय संरक्षण समिती व आपत्ती व्यवस्थापन क्लब तर्फे ३ ऑगस्ट रोजी परिसंवाद घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सपना केलोडे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत लैंगिक छळास प्रतिकार कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
दिवसेंदिवस मुलींच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांत वाढ होत आहे.परिणामी शालेय स्तरावरूनच विद्यार्थिनींना लैंगिक छळाचा प्रतिकार करण्याचे तंत्र अवगत होणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.
दरम्यान ३ ऑगस्ट रोजी स्थानिक स्कॉलर्स इंटरनॅशनल नॅशनल स्कूल येथे लैंगिक छळ संरक्षण समिती व शाळेतील आपत्ती व्यवस्थापन क्लब यांचे द्वारा परिसंवाद घेण्यात आला.यावेळी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सपना केलोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.यावेळी डॉक्टर केलोडे यांनी विद्यार्थिनींशी यथेच्छ संवाद साधत लैंगिक छळाचा प्रतिकार कसा करावयाचा याविषयी योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल येथील प्राचार्य मनु नायर यांचेसह येथील शिक्षिका व विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.