
— आदर्श बहुजन शिक्षक संघ IBTA महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांच्या आदेशान्वये,आदर्श बहुजन शिक्षक संघटना ibta महाराष्ट्र राज्याचे राज्य नेते, राज्यसंघटक गजानन गायकवाड व महेंद्र खडसे जिल्हाध्यक्ष वाशीम यांचे उपस्थितीत.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श शिक्षक तथा जिल्हा पदाधिकारी हे जिल्हा बदलीने नागपूर येथे रुजू झालेले सर्व परिचित तरुण, शिक्षक,विद्यार्थी व समाज यांच्या प्रगतीसाठी झटणारे आदर्श शिक्षक हेमराज कळंबे यांची विदर्भ प्रमुखपदी निवड करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर येथे काटोल तालुक्यात जिल्हा बदलीने रुजू झालेले शिक्षक नेते माणिक नाईक यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पुढील जिल्हा कार्यकारीणी चे अधिकार विदर्भ प्रमुख व जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आले.स़ंघटनेचे ध्येय धोरण,आणि विचारधारा डोळ्या समोर ठेऊन कार्य करावे. शिक्षक समस्या सोडविण्यासाठी व विद्यार्थी हितांच्या उपक्रमासाठी, सहृदय शुभेच्छा दिल्या. दोघांनीही संघटना वाढीसाठी व,शिक्षक समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहु असे मत व्यक्त यावेळी केले.
महाराष्ट्रातील सर्व इब्टा संघटना पदाधिकारी तथा त्यांच्या मित्र परिवाराकडून निवडीचे कौतुक होत आहे.