
– मारेगावातील राष्ट्रीय विद्यालयात आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पंचायत समिती,मारेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान करण्यात आले होते.यात स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकावला.
विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी,शिक्षक व जनसामान्यांना वैज्ञानिक माहिती, घटना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे व मनोरंजनातून समाज प्रबोधन व्हावे या हेतूने दरवर्षी विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
दरम्यान याही वर्षी मारेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन ता.११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मारेगावातील राष्ट्रीय विद्यालयत करण्यात आले होते.
या विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी शेडमाके,प्रमुख अतिथी राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत गारघाटे तर परीक्षक दिलीप मांडवकर व सौ.आवारी या होत्या.
यात मारेगावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या ८ वी,९ वी च्या विद्यार्थिनींनी “भरड धान्याचे फायदे व जंक फूडचे तोटे” या विषयावर उत्कृष्ट वैज्ञानिक नाटिका सादर केली.परिणामी या चमूस द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात द्वितीय पुरस्कार पटकावल्याने या विद्यार्थीनी कौतुकास पात्र आहे.