
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव……
भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नरसाळा ग्रामपंचायत
सदस्या सौ. शारदा दिगांबर पांडे यांचे आज सकाळी निधन झाले.
सौ.शारदा पांडे ह्या सामाजिक तथा राजकीय चळवळीत सक्रिय होत्या. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस तर नरसाळा ग्रामपंचायतच्या सदस्या सुध्दा होत्या.
सौ.शारदा पांडे याना मागील काही दिवसापासून डोक्याचा त्रास असल्याची माहीती असुन नागपूर येथे नियमित उपचार सुरु होते. मागील काही दिवसात त्यांना त्रास असह्य होत होता. उपचारासाठी नागपूर जवळ असल्याने त्या त्यांच्या मुलीकडेच हिंगणघाट येथे वास्तव्यास होत्या. परंतु आज त्यांचे निधन झाले.
त्यांचे पार्थिव मुळ गाव नरसाळा येथे आणण्यात आले असुन ५.३० वाजेदरम्यान हिंदु रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.