
– सखी मंच,मारेगाव
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
२२ मार्च रोजी झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दांपत्याचा मृत्यू झाल्याने मारेगाव-वणी सह अवघा परिसर हळहळला होता.मनमिळाऊ व सुस्वभावी डॉक्टर दांपत्याच्या अशा अवेळी जग सोडून जाण्याने मारेगाव ‘सखी मंच’ ही गहीवरला.२४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मारेगाव येथील न.प.प्रांगणात समस्त सखींनी साश्रूनयनांनी “डॉक्टर दांपत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
मारेगाव येथील महिला स्त्री रोग तज्ञ स्व.डॉ.अश्विनी गौरकार-झाडे (३१) व त्यांचे पती स्व.डॉ.अतुल गौरकार (४०) काही वैयक्तिक कामानिमित्त वणी येथुन नागपूरला जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने कारला धडक दिली असता भीषण अपघात होऊन डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
अवघ्या दीड वर्षाच्या मुलाला पोरक सोडत डॉक्टर दांपत्याने जगाचा निरोप घेतल्याने गौरकार कुटुंबासह सर्वसामान्यांनाही गहिवरून आले होते. आपल्यातीलच एक सखी जग सोडून गेल्याचे दुःख अनावर होत असतानाच २२ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मारेगाव न.प.च्या प्रांगणात ‘मारेगाव सखी मंच’ द्वारा डॉक्टर दांपत्याला साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहत सखींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यावेळी मारेगाव सखी मंच च्या सौ.काळे, सारिका गारघाटे,पूजा वासरीकर, अरुणाताई खंडाळकर,डॉ. केलोडे,अर्चना दरबेशवार यांचे सह असंख्य सखींची उपस्थिती होती.