
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
कुठल्याही क्षेत्रात कुणी कितीही उंची गाठली तरी, समाजकार्य हे केलच पाहीजे. आपण सगळेच समाजाचं देणं लागतो ही भावणा जपत कोणताही माणूस हा त्याच्या कर्माने मोठा होतो. असे प्रतिपादन पणन महासंघ संचालक, संजय खाडे यानी त्यांच्या जन्मदिनानिमित्त व सत्कार प्रसंगी, शेतकरी सुविधा केंद्रात तालुका काँग्रेस कमिटीकडुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे तर मंचावर मा.जि.प.सदस्य अरुणाताई खंडाळकर, अनिल पाटील देरकर, सुरेश काकडे, प्रशांत गोहोकर, प्रमोद वासेकर, कृऊबा समिती सभापती गौरीशंकर खुराणा, कृ.उ.बा.संचालक वसंत आसुटकर, अशोक धोबे, ता.काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, वसंत जिनिंग संचालक गजानन खापणे, अंकुश माफुर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, मालाताई बदकी, उत्तम गेडाम, तालूका युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी, तालूका काँग्रेस शहराध्यक्ष शंकर मडावी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना संजय खाडे म्हणाले की, माणूस हा कुठल्याही जातीधर्माचा असो तो अगोदर माणूस आहे. त्यामुळे प्रत्येकांनी एकमेकांसोबत प्रेमाने वागल तरच भविष्यात आपण माणसे जोडु. सध्या राजकारण सुध्दा सोप्प नसुन तेथे सुध्दा संघर्ष करावाच लागतो. म्हणून आपण समाजकारणार भर देत समाजासाठी काहीतरी करु कारण आपण समाजाचं देण लागतो. ही भावणा जोपासत येणाऱ्या काळात सरकार कोणतही असु द्या मी स्वतः, शेतकरी, शेतमजूर, रंजला गांजला, व ज्या ग्रामीण भागात मुलभूत सोयी नाहीत, बेरोजगारांचे प्रश्नाबाबत व इतर समाजाभिमुख प्रश्न घेवुन ह्या व्यथा शासन दरबारी निश्चितच मांडणार जेणेकरुन न्याय मिळेल. यासाठी आपण सर्व एकोप्याने व राजकीय पदाचा वापर जनकल्याणासाठी करु असा आशावाद व निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत सपाट यानी तर संचालन व आभार युवा शहर अध्यक्ष समिर सैय्यद, यांनी केले.