
– प्रभाग क्र.८ येथील साईबाबा मंदिरात होणार ‘मुर्तीची प्राणप्रतिष्ठा’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर येथील प्रभाग क्रमांक ८ मधील साईबाबा मंदिरात साईबाबा यांचे मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा ३ जुलै रोजी पं.राजेश महाराज पांडे व पं.गुड्ड महाराज पांडे यांचे हस्ते आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यास साई भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथै साई मंदिराची स्थापना करण्यात आली.शहरातील शेकडो नागरिकांनी एकत्र येत साई मंदिराचे बांधकामासह अत्यावश्यक लहान-मोठ्या गोष्टींची जुळवाजुळव करून मंदिर उभारणीत मोलाचा वाटा उचलला आहे.
दरम्यान गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ता.३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता भरत ठाकुर (साईभक्त वणी) तथा साईबाबा मंदिर समिती मारेगाव यांचे शुभहस्ते येथील साईबाबा मंदिरात साईबाबांचे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शेकडो साई भक्तांसह प्रभागातील नागरिक,तसेच शहरातील नागरिकांची उपस्थिती राहणार असुन परिसरातील भाविक भक्तांनी या दैदिप्यमान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन साईबाबा मंदिर समिती, मारेगाव यांनी केले आहे.