
– मारेगाव शहरातील घटना
लोकशस्त्र न्यु नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्रभाग क्रमांक १७ येथे आई वडीलांना भाडेतत्त्वावर घर करून राहत असलेल्या एका २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजे दरम्यान उघडकीस आली.ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सैफ अली मन्सूर अली सय्यद (२०) रा.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान सैफ अली हे १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजे दरम्यान त्यांचे राहते घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
वृत्त लिहीपर्यंत मृतक सैफ त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते.
मृतक सैफ यांचे पश्चात आई-वडील आहे.