
– नागपूर येथील रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मांगरूळ येथील प्रतिष्ठित युवा व्यावसायिक व मारेगाव स्थित आधार कृषी केंद्राचे संचालक प्रफुल्ल धंदरे यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील रूग्णालयात रविवारी सकाळी दुःखद निधन झाले.मृत्युसमयी ते ४० वर्षाचे होते.
प्रफुल्ल धंदरे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांचेवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते.
दरम्यान रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली.यातच उपचारास प्रतिसाद न दिल्याने प्रफुल यांनी नागपूर येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
मृत प्रफुल यांचे पश्चात आई-वडील,पत्नी एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती आहे.
प्रफुल्ल यांच्या अवेळी जग सोडून जाण्याने धंदरे कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.