
– मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका ४५ वर्षीय घटस्फोटीत महिलेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजे दरम्यान उघडकीस आली.परिणामी परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.
संगीता रोहिदास हेपट (४५) रा . म्हैसदोडका असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महीलेचे नाव आहे.संगीता यांचा ८ वर्षा आधी घटस्फोट झाल्याने त्या आपल्या भावाकडे म्हैसदोडका येथे राहत होत्या.
दरम्यान गत काही दिवसापासून मृतक संगीता यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती.अशातच त्यांनी ता.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेदरम्यान बोधाने यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
ऐन दिवाळी पर्वावर घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.