
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
हिवरी येथे शिक्षक पदावर कार्यरत असलेले व मच्छिंद्रा येथे वास्तव्यास असलेले अतुल पंढरी आत्राम (४०) यांचे २१ मार्च रोजी रात्री नागपुर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
पंचायत समिती मारेगाव येथे कार्यरत असलेल्या मनमिळावू स्वभावाच्या शिक्षकाच्या अशा अवेळी जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज दुपारी त्यांच्या मुळ गावी मच्छींद्रा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी,दोन मुले असा आप्त परिवार आहे.