
– यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
यवतमाळ जिल्ह्यातील कामगार चळवळीत सदैव कार्यतत्पर असणारे कामगार नेते एस.पी बुटे (नंदकुमार बुटे) सहाय्यक अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन २ जुलै रोजी यवतमाळ येथील बळीराजा चेतना भवन येथे करण्यात आले होते.
नंदकुमार बुटे यांनी केलेल्या सेवेचा सन्मान म्हणुन सेवापूर्ती सत्कार सोहळा यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने आयोजित केला होता. यावेळी महसूल कर्मचारी,अधिकारी यांची उपस्थिती होती.
सेवापूर्ती सोहळ्यानंतर लगेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.