
– चार मे रोजी कॅम्पचे नियोजनाची आयोजकांकडून माहिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या तीन महिन्यापासून शहरातील आरटीओ कॅम्पचा सावळा गोंधळ कायम असून मारेगाव येथील आरटीओ कॅम्प चार मे रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसला नियोजित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
तब्बल तीन महिन्यापासून शहरात आरटीओ कॅम्प होणार असे आयोजकांकडून सांगितले जात असले तरी सदर बाबीची कायमस्वरूपी पुष्टी शहरात झाली नाही. ‘ऑनलाइन डॉक्युमेंटेशन प्रोसेस’ चा अडथळा आल्याने अजून पावेतो शहरातील आरटीओ कॅप १००% यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही.
दरम्यान चार मे रोजी शहरातील बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसला आरटीओ कॅम्प नियोजित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली असुन यावेळी ‘आरटीओ कॅम्प होणार की कॅम्पचा सावळा गोंधळ कायम राहणार’ याकडे जनसामान्यांचे डोळे लागले आहे.