
– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी – यवतमाळ राज्य महामार्गावरील मांगरूळ येथील पवनसुत नर्सरी नजीक दुचाकीला रानडुक्करांचा कळप आडवा आल्याने दुचाकीस्वार वकील जखमी झाल्याची घटना चार मे रोजी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान घडली.
सतीश जगन्नाथ नांदेकर (४५) रा.वणी हे व्यवसायाने वकील असून चार मे रोजी काही कामानिमित्त ते मारेगाव येथे आले असता सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान वणी येथे परतीच्या प्रवासात असता मांगरूळ येथील पवनसुत नर्सरी नजीक त्यांच्या दुचाकीला अचानक रानडुक्करांचा कळप आडवा आला.यात त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या कडेला कोसळले असता त्यांच्या डोक्याला व पाठीला मार लागुन ते जखमी झाले.
रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतीश यांना प्रथमोपचारा करिता मारेगाव येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.