
– मनसे तालुका शाखा मारेगाव यांचा स्तुत्य उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १३ जुन रोजी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोके यांचे नेतृत्वात शहरातील साई मंदिर परिसरात वृक्षारोपण करून राज ठाकरे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्ष लागवड व संगोपन ही काळाची गरज असून त्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असताना तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १३ जुन रोजी वृक्षारोपणाचा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन अनाठायी खर्चाला बगल देत राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
मारेगावातील साई मंदिर परिसरात कडुलिंब,करंजी तसेच अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करून वृक्षारोपणाचा हा सोहळा आनंदात पार पडला. यावेळी मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांना मनोमनी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,सुरज नागोसे,आदित्य बुचे,शेख नबी,अनंता जुमळे, गजानन चंदनखेडे, चांद बहादे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या प्रतिभा तातेड, सिंधू बेसकर,नगरसेवक अंजु नबी शेख,संगीता सोनुले,बेबी आत्राम यांचेसह शेकडो मनसे सैनिक उपस्थित होते.