
– नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांची गळाभेट व सत्कार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल माणिकराव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.
दरम्यान मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांनी माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी माणिकराव ठाकरे यांना वाढदिवसाच्या तसेच अखिल भारतीय सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबाबत शुभेच्छा देण्यात आली.
यावेळी माणिकराव ठाकरे यांनीही मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,नगर सेवक आकाश बदकी,सरपंच तुळशीराम कुमरे,अंकुश माफुर, गौरव आसेकर, उपस्थित होते.