
– मारेगाव तालुक्यातील आपटी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील आपटी येथील एका वीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना ता.१२ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजेदरम्यान उघडकीस आली.
प्रज्वल मोहन बोढे (२०) रा. आपटी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून मृतक वरोरा येथे फर्स्ट इअरला रुम भाडेतत्त्वावर घेऊन शिक्षण घेत होता.
वडीलांना पॅरॅलिसिस असुन शेतीची कामे असल्याने आईला मदत म्हणुन तीन चार दिवसांपासून तो वरोरा वरुन आपटी येथे येणे जाणे करीत असल्याची माहीती आहे.
दरम्यान ता.१२ ऑक्टोबर रोजी काॅलेज करुन आल्यावर तो शेतात जावुन घरी आला. मात्र घरी आल्यावर घरातच दोराने गळफास घेऊन प्रज्वलने जीवन यात्रा संपविल्याची माहीती असुन प्रज्वलने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला असावा…? अशी गावकऱ्यात चर्चा आहे.
मृतकाच्या मागे आई, बाबा व बहीण असल्याची माहिती आहे.