
♦हवामान अंदाजक-पंजाबराव डख यांनी वर्तवलेला हवामानाचा अंदाज सर्व शेतकरी बांधवांसाठी
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
•सर्व शेतकरी बांधवांनो,गहू,हरभरा,मका काढून घ्या.
•१३ तारखेपासून पावसाचे आगमन नाशिक कडून झाले आहे.
•त्यानंतर पाऊस पुढे सरकत १४,१५,१६ तारखेला विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये पडणार आहे.
•त्यानंतर १६ ते २० तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे.जिथे पाऊस नाही पडला तिथे सोसाट्याचा वारा सुटणार आहे.
•गारा पडण्याची शक्यता तेलंगणा, यवतमाळ,नांदेडमध्ये असेल.
•जास्त पाऊस १६,१७,१८ मार्च रोजी पडेल.१७ तारखेला बरीच लग्न आहेत.तर त्या दिवशी सकाळी लग्नाचा कार्यक्रम आटोपून घ्या.कारण तेव्हा पाऊस रात्री आणि दुपारी पडेल.
•वीज आणि वारा येऊ शकतात.पाऊस येणार म्हणजे येणारच.