
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
भारत देश ८०% टक्के खेड्यात वसला असुन कष्टकरी जनतेच्या भरोशावर देशाचा डोलारा ऊभा आहे. मात्र गाव,खेडे, व पाड्यात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेडे समृद्ध व्हावे यासाठी चळवळ उभी केली करुन ग्राम समृध्दी साठी लोकांच्या सेवेत “ग्राम गीता” दिली. परंतु काळाच्या ओघात व या विज्ञान युगात सगळेच भौतिक सुखाच्या लालसेपोटी नैतिक, अनैतिकतेचा विसर पडल्याने तोच महाराजांचा वारसा जपत तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून संपुर्ण तालुक्यात “गाव तेथे ग्रामगीता अभियान राबविण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून महागाव येथे गाव तेथे ग्राम गीता अभियान अंतर्गत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकारातून गाव तेथे ग्राम गीता हे अभियान ता. २५ डिसेंबर २०२२ पासुन राबविण्यात येत असुन तालुक्यातील प्रत्येक खेड्यात जाऊन तेथील समस्या जाणून ग्राम गीतेची शिकवण दिल्या जात असुन ता. १२ मार्च रोजी महागाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच अविनाश लांबट, प्रमुख अतिथी पाटील गुरुजी, डॉ. मुळे (निर्वाचन अधिकारी), पद्माकर डाखरे, (जिल्हा सेवधिकारी), रुपेश ढोके (प्रचारक), लिहीतकर दादा (प्रचारक), होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन मिलमिले यांनी केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अनिल नावडे, बंडू सुर, पांडुरंग कालेकर, सुनील देऊळकर, मत्ते दादा, येवले दादा, भास्कर आत्राम, मुरलीधर बलकी, चंद्रभान खापणे, विलास दर्वे, जानराव कोटनाके, दादाजी टेकाम, मनोहर नेहारे, कृष्ण पिंपळकर, बंडूजी वाघाडे,यासह समस्त महागांव ग्रामवासी उपस्थित होते.
◊या पुर्वी सुध्दा गुरुदेव सेवा मंडळाचे कानडा येथील सक्रीय सभासद रुपेश ढोके यांच्या संकल्पनेतून “एक पाऊल खेड्याकडे” हा जनहिताचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. तेव्हा सुध्दा उदंड प्रतिसाद मिळत काही अंशी ग्रामीण भागातील समस्या प्रशासकीय स्तरावर मांडून व पाठपुरावा करत सोडविण्यात आल्या होत्या.◊