
– अवैध दारू पकडली
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
बोटोनी येथील रणरागिनींनी अवैध दारू विक्रीत विरोधात पुनश्च एकदा एल्गार पुकारत रविवारी रात्री नऊ वाजता दुसऱ्यांदा अवैध दारू पकडली.यावेळी दारू विक्रेत्यांने मात्र घटनास्थळावरून पळ काढला.गेल्या पाच दिवसात येथील महिलांनी अवैध दारू विक्रीला लगाम लावण्यासाठी स्वतः पुढाकार घेत दारू पकडल्याने येथील महिलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील बोटोनी हद्दीत राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.तरुण व्यसनाधीन झाल्याने कौटुंबिक कलह वाढत असुन मद्यपींचे दारू पिऊन महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान ३० मे रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान बोटोनी येथील रणरागिनींनी एल्गार पुकारत अवैध देशी दारूचे २५ पव्वे अंदाजे किंमत २००० ₹. पकडून देत प्रशासनाच्या स्वाधीन केली. महिलांचा रुद्रावतार पाहून अवैध दारू विक्रेता संजय चिकटे याने घटनास्थळावरून पोबारा केला.
यावेळी बोटोनी येथील माजी प. सदस्या सौ.सुनीता लालसरे, सरपंचा सौ.सुनिता जुमनाके ,सविता स.मत्ते, वैशाली रा. गानफाडे, वेनूबाई तुरणकार ,किरण तुरणकार, सरिता मत्ते, वनिता सिडाम ,सुरेखा निंदेवार, रंजना दोडेवार यांचेसह बोटोनी येथील शेकडो महिला होत्या.