
— ता. स. संघटनेचे गट वि.अधिकारी यांचे मार्फत रा. अ. इतर मागास वर्ग हंसराज अहिर यांना निवेदन.
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव…..
मागील एक वर्षांपासून मोदी (ओबीसी) आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मिळणारे आर्थिक सहाय्य मिळाले नाही. परिणामी घरकुल बांधकाम ठप्प झाले असुन ऐन पावसाळ्यात घरकुल लाभार्थी उघड्यावर असल्याचे वास्तव असल्याने घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्ते देण्यात यावे यासाठी गटविकास अधिकारी यांचे मार्फत, तालूका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अविनाश लांबट यांचे नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग (ओबीसी) हंसराज अहीर यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेंतर्गत (ओबीसी) अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याने लाभार्थ्यांनी बांधकामास सुरुवात सुध्दा केली. मात्र शासन प्रशासनाकडुन बांधकामास मिळणारा निधी ता..२३/०५/२०२३ पासून मिळाला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम ठप्प झाले आहे. पावसाळा सुरु असल्याने कुटुंबाला उघड्यावर ठेवू शकत नसल्याने परिणामी खोली भाडे ,व घरासाठी घेण्यात आलेली उसनवार रक्कम या आर्थिक विवंचनेमुळे घरकुल लाभार्थी पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे तालूका सरपंच संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तत्काळ देण्यात यावे यासाठी गटविकास अधिकारी यांचे मार्फत इतर मागास वर्ग राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले.
यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, यांचेसह सरपंच संघटनेचे पदाधिकारी तथा सरपंच उपसरपंच सुरेश लांडे, मालालाई गौरकार, राहुल आत्राम,
नंदाताई मेश्राम, चंदु जवादे, प्रविण, नान्हे, प्रशांत भंडारी
उपस्थित होते.