
– सुदैवाने जीवितहानी नाही
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील पेंढरी येथे प्रचंड वादळी वाऱ्याच्या तडाक्यात येथील कडुलिंबाचे झाड विजेच्या तारांवर उन्मळून पडल्याने तीन ते चार विजेच्या तारा जी.प.शाळेच्या प्रांगणात तुटुन पडल्याची घटना ११ जून रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान घडली.सुदैवात यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासून उन्हाने पुरता कहर केला असून तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्र प्रारंभ होऊन काही दिवस लोटले असले तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहे.
दरम्यान ११ जुन रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान तालुक्यातील पेंढरी येथे जोरदार वादळी वाऱ्याचे आगमन झाले. यात येथील जिल्हा परिषद शाळे लागत असलेल्या कडुलिंबाचे झाड विजेच्या तारांवर उन्मळून पडले असता तीन ते चार विजेच्या तारा जि.प. शाळेच्या प्रांगणात तुटून पडल्या.
शाळा बंद असल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी मात्र झाली नाही.