
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
लोकसभा निवडणूक २०२४ व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरासह तालुक्यातील शांतता अबाधित असावी यासाठी शहराच्या मुख्य व अंतर्गत मार्गावरुन मारेगाव पोलिसांनी ता. १४ एप्रिल रोजी १० ते ११ वाजेदरम्यान पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात पथ संचलन करीत मारेगाव पोलीस सज्ज असल्याचा प्रत्यय आला.
येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक असुन शहरासह तालुक्यात रामनवमी तथा हनुमान जयंती असल्याने हे उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधित रहावी व सलोखा कायम असावा यासाठी पोलीस स्टेशन पासुन महामार्गावरील मार्डी चौक, डाॅ.आंबेडकर चौक, अंतर्गत मार्गावरील गौसिया मस्जिद, जुनी वस्ती, नगरपंचायत, आदी मुख्यमार्गांवरून ता. १४ एप्रिल रोजी १० ते ११ वाजेदरम्यान पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात पथ संचलन करण्यात आले.
या पथसंचलनात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस अमलदार, १४ होमगार्ड, तथा एस आर पी एफ जवान यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.