
— दुचाकीस्वार जागीच ठार
— गोविंदराजा कोटेक्स जवळील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
परस्पर विरुध्द दिशेनी येणाऱ्या पीकअप व दुचाकीची जबर धडक झाल्याने एक ३५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ता.१९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान वणी यवतमाळ राज्यमार्गावरील मारेगाव लगत असलेल्या गोविंदराजा कोटेक्स जवळ घडली.
अपघातात ठार झालेल्या ३५ वर्षीय इसमाचे नाव रविंद्र हरिदास कोरझरे असुन ते तालुक्यातील सालेभट्टी येथे वास्तव्यास होते.मृतक रविंद्र हे ट्रक चालक असल्याने ते मारेगाव येथील व्यावसायिकाकडे कामाला होते. सालेभट्टी वरुन नरसाळा येथे येण्याजाण्यास त्यांना अडचण येऊ नये म्हणून मालकानी मृतकास एमएच ३१ एएस २५७९ क्रमांकाची दुचाकी दिली होती.
दरम्यान ता. १९ एप्रिल रोजी काम आटोपून मृतक रविंद्र हे सालेभट्टी येथे परतीच्या प्रवासात असतांना वणी यवतमाळ राज्यमार्गावरील गोविंदराजा कोटेक्स जवळ विरुध्द दिशेनी येणाऱ्या एमएच २९ बीई ६६३१ या क्रमांकाच्या पीकअप वाहनानाने रात्री ८.३० वाजेदरम्यान जबर धडक दिली. या धडकेत रविंद्र हे जागीच ठार झाले.मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतकाच्या पाठीमागे वडील, दोन बहीनी, पत्नी व तीन मुली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार करीत आहेत.