
– कुटुंबास यवतमाळ जिल्हा कोतवाल संघटना कार्यकारिणीची सांत्वनपर भेट…
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दारव्हा तालुक्यातील सावळा साज्यातील कोतवाल विष्णू पडघने यांचा २६ एप्रिल रोजी अपघात झाला होता.त्यांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान ३० एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले.सदोदीत सामाजिक कार्यात अग्रेसर जनहित कल्याण संघटनेने तीन मे रोजी पडघणे कुटुंबास आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन दिले.
यवतमाळ जिल्हा कोतवाल संघटनेने ३ मे रोजी जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचेसमवेत पडघने कुटुंबास सांत्वनपर भेट दिली.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ. छाया दरोडे ,जिल्हाध्यक्ष शशीकांत निमसटकर यांनी सांगितले की “कोतवाल संघटना सर्वोदय असुन एका कुटुंबाप्रमाणे सर्वांच्या सुख दु:खात सहभागी रहाते, तसेच संघटना प्रतेक गोष्टीचा बारकाईने विचार करते, अश्या या प्रसंगी सदर कुटुंबाला फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना या साठी संघटनेतील सर्वजन प्रयत्नशिल राहतीलच.”
दरम्यान सदोदीत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी पडघने कुटुंबाचे दुःख समजून घेत दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन देत कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,अध्यक्ष समीर कुडमेथे , उपाध्यक्ष रॉयल सय्यद,सचिव निलेश तेलंग यांचेसह दिनकर डुकरे,काशिनाथ खडसे,रवीभाऊ पोटे,सचिन देवाळकर,प्रमोद रिंगोले,शरीफ सय्यद,गौरव आसेकर,प्रफुल उरकुडे,कपिल कुडमेथे,सोनू गेडाम,स्वप्नील तलांडे,पंकज पांडे यांचेसह यवतमाळ जिल्हा कोतवाल संघटना कार्यकारिणीतील सौ. छाया दरोडे, शशीकांत निमसटकर, प्रशांत प्रभाते, उत्तम पाचभाई, राकेश संकिलवार, किरण मोरे, चंद्रभान देवाळकर, महेश पाटिल, आश्विन बडकार, महेश घोडाम उपस्थित होते.
कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याची बाब कळल्याने मन सून्न झाले. कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटुंबाच्या दुःखाचा अंत लावता येणार नाही.या आर्थिक मदतीने त्यांची उणीव भरून निघणार नसली तरी कुटुंबाला येणाऱ्या काही अडचणी नक्कीच कमी करता येतील.
नीलेश तेलंग,सचिव, जनहित कल्याण संघटना, मारेगाव.