
– कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासन सज्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
अवघ्या आठ दिवसांवर मोहरम उत्सव असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यावी यासाठी ता.१७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांनी ता. २९ जुलै रोजी होऊ घातलेल्या मोहरम उत्सवानिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन करत शांतता समितीसह तालुक्यातील नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सुध्दा यावेळी केले.
यावेळी शांतता समिती सदस्य गजानन पाटील किन्हेकर, डाॅ. भास्कर महाकुलकर, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, उदय रायपुरे, दुष्यंत जयस्वाल, खालीद पटेल, अनिल गेडाम, विशाल किन्हेकार, विजय मेश्राम, अजय रायपुरे, पोलीस अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.