
— कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ता. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस स्टेशन च्या प्रांगणात, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र व मस्जिद कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेत, तालुक्यातील समस्त जनतेला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले.
आगामी सण उत्सव अर्थातच आजपासून सुरु होणारा गणेशोत्सव, ईद ए मिलाद, यासारखे उत्सव साजरे करण्यात येणार असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, तालुक्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये, सगळ्यांनी एकोपा राखावा यासाठी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी आवाहन केले असुन, पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका राहील असे आश्वासीत करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्यातील ग्राम प्रमुख, ग्रामसुरक्षा दल आणि पोलीस पाटलांनी सजग रहावे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी व सहकार्यासाठी पोलीस स्टेशन व बीट अंमलदार यांना माहीती द्यावी असे आवाहन, ता.६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या सभेत पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले. यावेळी शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र, तथा मस्जिद कमिटी सदस्य उपस्थित होते.