
– तालुका भाजप महिला आक्रमक : निवेदन देत व्यक्त केला निषेध
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या बाबत मानहानी व बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाडांना आवर घाला अशा आशयाचे,मारेगाव तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात सबलीकरण करण्याचे तसेच सामाजीक,आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करत असुन ज्या ठीकाणी महिलांवर अन्याय होतो,त्या त्या ठीकाणी आवाज उठवुन महिलांना न्याय देणाचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
परंतु काही राजकीय मंडळींना हे आवडत नसल्याने भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे बाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ता. ९ जुन रोजी रात्री १२.५३ वाजता ट्विटर वर बदनामीकारक मजकूर अपलोड केल्याने मारेगाव भाजप तालुका महिला मोर्चामध्ये संतापाची लाट उसळली. या मानहानी व बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करत महिला पदाधिकारी यांनी जितेंद्र आव्हाडांना आवर घालण्यात यावा अशा आशयाचे मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी सौ. सुनिता दे. पांढरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. शालीनी दारुंडे,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. मंदा थेरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे यांचेसह महीला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.