
– मारेगावात धरणे आंदोलन
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मोदी सरकारने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज दुपारी मारेगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेसचे जेष्ठ नेते,माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकसभा सचिवालयाने त्वरित हालचाली करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले असून हा घटनेचा अपमान आहे.
जोपर्यंत राहुल गांधी यांची शिक्षा व निलंबन मागे घेणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देईल अशा आशयाचे निवेदन काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २७ मार्च रोजी मारेगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ धरणे आंदोलन करून तत्संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देत जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे, माजी सभापती कृ.उ.बा.स.मारेगाव सौ. अरुणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, प्रफुल्ल विखनकर, नंदेश्वर आसुटकर,अंकुश माफुर, धनंजय आसुटकर, माणिक पांगुळ विलास वासाडे, रमण डोये,राजू पाचभाई यांचे सह मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.