
– जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील ST संवर्गातील १८ ते ४५ या वयोगटातील युवक व युवतीं करीता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचे द्वारे आयोजित व जिल्हा उद्योग केन्द्र, यवतमाळ पुरस्कृत निशुल्क घरगुती उपकरण दुरुस्ती व अन्नप्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन १० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ईच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
घरगुती उपकरण दुरुस्ती (मुलांकरिता ) व अन्नप्रक्रिया (Food Processing) युवती व महिलांकरिता राहणार असुन याकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट आहे.
सदर निशुल्क प्रशिक्षणाचा कालावधी हा एक महीण्याचा राहणार असुन ST प्रवर्गातील १८ ते ४५ वयो गटातील महिला व पुरुष दोघांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास प्रमाणपत्र व स्टायफंड म्हणून एक हजार रुपये दिले जाणार आहे.
प्रकल्प अधिकारी MCED यवतमाळ व मारेगाव तालुका समन्वयक कैलास दुधकोहळे (८८०६७२११३३) यांनी गरजूंना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.