
– १६ ते १८ ऑक्टोंबर दरम्यान रंगणार कबड्डीचा थरार
– ४२ संघांचा सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन संत गाडगेबाबा विद्यापीठ,अमरावती व मारेगाव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून ता.१६ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोंबर दरम्यान येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कबड्डीचा थरार रंगणार आहे.यात स्पर्धेत ४२ संघ सहभागी होणार आहे.
जगभरातील क्रीडा क्षेत्राचा परीघ विस्तारत असून त्यात भारताचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे.क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडताना दिसतात. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा, तालुका, स्तरावरही खेळांविषयीची जागरूकता वाढलेली दिसून येते.
हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या प्रयत्नातून मारेगाव तालुक्यात प्रथमच विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडणाऱ्या अंतर विद्यालय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे व प्रा.डॉ. विकास टोणे,सदस्य, निवड समिती शारीरिक शिक्षक विभाग, संत गाडगे बाबा, विद्यापीठ, अमरावती यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री.गजानन महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,मुकुटबन येथील प्राचार्य डॉ.संजय घरोटे, प्रा. डॉ. दिलीप मालेकर, शारीरिक शिक्षण संचालक व प्रा.डॉ.अभिजित आवारी उपस्थित राहणार आहेत.
परिणामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित स्पर्धेसाठी मारेगाव तालुक्यातील क्रीडा रसिकांनी विद्यापीठ स्तरावरून येणाऱ्या ४२ संघाचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.