
— साई मित्र परिवाराचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
दोन दिवसीय गुरूपोर्णिमा पर्वावर साई मित्र परिवाराच्या पुढाकारातून ता.२० जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान स्थानिक जगन्नाथ महाराज मंदिरात महारक्तदान शिबिर तथा ता.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमा महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सलग १४ वर्षांपासून साई मित्र परिवार अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रम राबवत असुन कोरोना काळात साई मित्रपरिवार च्या वतीने गरजुंना सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला होता. याच सोबत सलग १४ वर्षापासुन गरजु रुग्णांना रक्ताची कमतरता भासु नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असुन यापुढेही ही परंपरा अबाधित असावी असा साई मित्र परिवाराचा मानस असल्याने ता. २० जुलै रोजी गुरूपोर्णिमेच्या पावन पर्वावर, वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ च्या सौजन्याने, स्थानिक जगन्नाथ महाराज मंदिरात सकाळी ११ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन गरीब गरजु रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी
रक्तदात्यांनी रक्त दान करण्याचे आव्हान साई मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच ता. २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद कार्यक्रमानंतर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद व शोभायात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सुध्दा साई मित्र परिवाराच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
रक्तदात्यांना आवाहन…!
अनेक आजाराच्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, अपघातग्रस्त, सिकलसेल यासारख्या व अन्य गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असल्याने तालुक्यातील जनतेनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे.
साई मित्र परिवार, मारेगाव