
– ५५ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केले रक्तदान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त मारेगावातील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात ता.२५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ५५ विद्यार्थी व शिक्षकांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
जागतिक फार्मासिस्ट दिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक फार्मासिस्ट दिनाचा हा उपक्रम इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने (FIP) घेतला होता, ज्याला सन २००० मध्ये इस्तंबूल येथे झालेल्या परिषदेत मान्यता देण्यात आली होती.
दरम्यान ता.२५ सप्टेंबर रोजी मारेगावातील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी रक्तदान केले.यावेळी ५५ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
यावेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश चचडा, प्रमुख पाहुणे शरद केळकर, अजय लुटे,नायब तहसीलदार काळे यांचेसह फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.