
— तालूका काँग्रेस कमिटीचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राज्य सरकारकडून आमची लाडकी बहीन योजना राबविण्यात येत असुन या योजनेचा लाभ तालुक्यातील माता भगीनिंना मिळावा तथा पैशाच्या अडचणीमुळे लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सहकार्यातून तथा तालुका काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने ता. ४ जूलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोफत ऑनलाईन सेवा केंद्राचे, माजी जि. परिषद सदस्या सौ. अरुणाताई खंडाळकर यांच्या हस्ते तर तालूका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकर, कृ. उ. बा. समिती सभापती तथा जिल्हा सरचिटणीस गौरीशंकर खुराणा यांचेसह काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या जागेवर वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले.
राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक योजना राबविण्यात आल्या परंतू अनेकांना त्या योजनांचा लाभ मिळाला नाही किंवा सरकारकडून नुसताच योजनांचा बागूलबूवा करण्यात आला. म्हणून तालूका काँग्रेस कमिटीकडुन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त तथा नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सहकार्यातून माता भगीनिंची हेळसांड होऊ नये, खिशाला कात्री बसु नये या उदात्त हेतुने मोफत ऑनलाईन सेवा केंद्र सुरु करीत असल्याचे प्रतिपादन माजी जि. परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर यानी या उदघाटन प्रसंगी केले.
या प्रसंगी काँग्रेसच्या माजी जि. प. सदस्या अरुणाताई खंडाळकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिल्हा सरचिटणीस गौरीशंकर खुराणा, यादव काळे, शहराध्यक्ष शंकर मडावी, प्रफुल्ल विखनकर, ता. युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी, शैलेश आत्राम, रवी धानोरकर, गजानन खापने, माणिक पांगूळ, शकुंतला वैद्य, माया पेंदोर, प्रतिभा कळसकर, बंडू खडसे, तुळशीराम कुमरे, समिर सैय्यद, समिर कुडमथे, शाहरुख शेख यांचेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.