
– कृ.उ.बा.स.सभापतींच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद
– शेकडोंचा जनसागर उपोषण मंडपात
– महावितरण वरीष्ठांवर प्रश्नांची सरबत्ती
– अनेक संघटनांचा पाठींबा असलेले उपोषण अखेर निवळले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यात सुरू असलेल्या महावितरणच्या मनमानी विरोधात तालुका काँग्रेस कमिटीने २३ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कृ.उ.बा.स.सभापतींच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषण मंडपात हजेरी दर्शवली. शेकडोंचा जनसागर उपोषण मंडपात हजर असताना महावितरण वरिष्ठांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. सदर उपोषणास अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला होता. अखेर बराच वेळ चिघळलेल्या उपोषणाची महावितरण अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली.परिणामी उपोषण मागे घेण्यात आले.
तालुक्यातील खरीप व रब्बी पिकांना पाण्याची नितांत गरज असताना महावितरण कडून मात्र लोडशेडिंग सुरू आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात चक्क १८ तास विजेचे लोडशेडींग सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात अनेक अडचणी येत आहे.महावितरणच्या या मनमानी विरोधात तालुका काँग्रेस कमिटीने पुढाकार घेत २३ ऑक्टोंबर रोजी पासून काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांचे मार्गदर्शनात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते.यावेळी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारुती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी व काँग्रेस कार्यकर्ते अंकुश माफुर विविध मागण्या घेऊन उपोषणास बसले होते.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महावितरण उपभियंत्यांनी उपोषण मंडपात भेट देऊन उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणावू तोडगा निघण्याचे संकेत दिले होते.दरम्यान दुपारी २ वाजता पांढरकवडा व यवतमाळ येथील वरिष्ठ महावितरण अभियंत्यांचा फौजफाटा उपोषण मंडपात दाखल झाला.यावेळी उपोषण मंडपात उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरिष्ठांवर प्रश्नांचा भडीमार केला.यावेळी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी वरिष्ठांना अनेक प्रश्न विचारत शेतकऱ्यांप्रती असलेली आपली तळमळ दाखवली.
सुरुवातीस वरिष्ठांकडून वेळ चलाऊ उत्तरे मिळाल्याने उपोषण मंडपात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.उपोषण कर्ते आक्रमक झाले होते. अखेर दीर्घ चर्चेनंतर वरिष्ठांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली.परिणामी तालुक्यातील वनोजा देवी येथील मंजुर असलेले उपकेंद्र ठेकेदार उपलब्ध होताच सुरू करण्यात येईल, यामुळे तालुक्यात लोड शेडिंगची गरज भासणार नाही, खापरी उपकेंद्र येथे ६.५ एकर जागेत व नरसाळा येथे २२ एकर जागेत उप सोलार उपकेंद्र मंजूर असून लवकरच त्या कामास सुरुवात होईल यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध होईल, मारेगाव तालुक्यात१३२ केव्हीचे उपकेंद्र बनविण्याचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसात तयार केला जाईल अशी लेखी ग्वाही दिली.परिणामी वरिष्ठांच्या लेखी आश्वासनाअंती उपोषणकर्त्यांनी सदर आमरण उपोषण मागे घेतले.
अनेक संघटनांचा पाठींबा…!
जनहितासाठी उभं केलेल्या या आमरण उपोषणास अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला होता.यात जनहित कल्याण संघटना मारेगाव, तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे केंद्रीय सदस्य कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे सोबतच ,गावखेड्यातील नागरिक, पुढारी ,उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण मंडपात उपस्थित राहात उपोषणास आपला पाठिंबा दर्शविला होता.
वीज वितरण उपअभियंता शैलेंद्र कुमार पाटील यांनी उपोषण कर्ते व त्यांचे वरिष्ठ यांच्याशी योग्य सल्लामसलत करून दोन्ही पक्षांत संवाद घडवून आणला.
यावेळी उपोषण मंडपात काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, डॉक्टर महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मारुती गौरकार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा, काँग्रेस कार्यकर्ते अंकुश माफुर,समिर सैय्यद , प्रफुल विखणकर, शाहरुख शेख तथा शेकडो काँग्रेस कार्यकर्ते,कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांचे सह जनहित कल्याण संघटनेचे मार्गदर्शक काशिनाथजी खडसे, अध्यक्ष समीर कुडमेथे,उपाध्यक्ष रॉयल सय्यद,सचिव निलेश तेलंग, सदस्य गौरव आसेकर,प्रमोद रींगोले,अल्ताफ कुरेशी, बन्सी पाटील, स्वप्निल तलांडे, पियुष डंभारे ,आकाश भेले, दिनकर डुकरे ,धीरज डांगले, कपिल कुडमेथे,शाहिद कुरेशी,पवन गेडाम यांचेसह जनहित महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा कविताताई मडावी, सचिव सुवर्णाताई खामनकर सह सदस्या शितलताई पोटे, नूतन तेलंग, अश्विनी खाडे,सपना वनकर, सुनिता कुडमेथे ,तमन्ना शेख, पूजा तेलंग, रसिका गेडाम ,विजया ताई कांबळे आदी उपस्थित होत्या.