
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, तथा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांची कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव च्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल,राज्यस्तरीय खेळाडूंच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय खेळाडू व राज्यस्तरीय खेळाडूच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
शहरी भागासह ग्रामिण भागातील खेळाडुंना क्रिकेट खेळात प्राधान्य मिळाले पाहीजे ही भावणा जोपासत अग्रक्रमाने या खेळाडुंना जनहित कल्याण संघटनेच्या सहभागातून व संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे प्रयत्नातून ग्रामिण भागातील क्रिकेट खेळाडुना खेळवल्या जात असुन खेळाडुंचे मनोबल उंचवले आहे.
याच सोबत समाज बांधिलकीतून आरोग्य सेवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, अपघात ग्रस्तांना आकस्मिक मदत देत त्यांच्या कार्याचा आलेख नजरेत भरण्यास बाध्य करत असुन, त्याचेच फलीत की काय? म्हणून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी योग्य उमेदवार म्हणून वरिष्ठांनी गौरीशंकर खुराणा यांच्या नावाला पसंती दर्शवत त्यांची बहुमताने सभापतीपदासाठी निवड करण्यात आली.
दरम्यान सभापती म्हणून निवड झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव गौतम जीवने, उपाध्यक्ष प्रितेश लोणारे, यवतमाळ जिल्हा सदस्य संदीप दुपारे, शाहिद शेख, राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू यांच्या हस्ते शाल, तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.