
– हृदयविकाराच्या झटक्याने मनमिळाऊ युवक काळाने हिरावला
– डाखरे कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
येथील प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे सुपुत्र तुषार डाखरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता.२५) रात्री १० वाजेदरम्यान निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ३५ वर्ष होते.
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ९ येथे डाखरे कुटुंब वास्तव्यास आहे.वडील एकनाथ डाखरे हे मारेगाव येथे डॉक्टर असुन तुषार यांचे स्वतःचे मेडिकल स्टोअर्स असुन ते एका ढाब्याचे संचालक होते.तुषार यांचा मित्रपरिवार व सवंगड्याचा जमघट मारेगावात मोठ्या प्रमाणात आहे.
मंगळवारला रात्री १० वाजेदरम्यान ढाब्यावर असता त्यांना अचानक छातीत दुखु लागले.तुषार यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असता वाटेतच चिखलगाव नजीक त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मनमिळाऊ स्वभावाच्या तुषार यांचे अशा अवेळी जाण्याने डाखरे कुटुंबासह त्यांचे मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
तुषार यांचे पश्चात आई , वडील, पत्नी व एक चार वर्षांचा मुलगा आहेत. आज दुपारी मारेगाव स्थित स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.