
– बोढाले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथील रहिवासी किशोर बोढाले यांच्या आई सुशीला फकरु बोढाले यांचे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शनिवारी रात्री १:३० वाजे दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ६० वर्षाच्या होत्या.
गत काही दिवसापासून सुशीला बोढाले यांची तब्येत बरी नसल्याने त्या पांढुर्ना स्थित मुलीकडे वास्तव्यास होत्या.
तेथे त्यांचेवर नियमित उपचार सुरू होते.
दरम्यान शनिवारी रात्री १:३० वाजे दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.यात त्या जागीच गतप्राण झाल्या.
मध्यरात्रीच त्यांचे पार्थिव पांढुर्ना येथून मारेगाव येथील त्यांचे राहते घरी आणण्यात आले. आज दुपारी १२ वाजता त्यांचे पार्थिवावर स्थानिक मारेगाव येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
कोरोना काळात पती गमविलेल्या सुशीला बोढाले यांचे अशा वेळी एक्झिटने बोढाले कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत सुशिला यांचे पश्चात मुलगा किशोर ,सुन,मुलगी पोर्णीमा,चार नातवंड असा आप्तपरिवार आहे.